Eknath Shinde | Narendra Modi – मोदींसाठी नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे. विरोधकांकडे झेंडा नाही, अजेंडा नाही. विरोधक कमिशन आणि करप्शन फर्स्टसाठी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात केलेले काम आणि काँग्रेसने 50 ते 60 वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. । Eknath Shinde | Narendra Modi । Lok Sabha Election 2024
सावनेर येथे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. मागील 10 वर्ष आपण मोदींची बॅटींग पाहिली. त्यांनी देशाचा विकास केला आहे. आता पुढची पाच वर्ष पंतप्रधान मोदी चौकार आणि षटकार मारून विरोधकांना झोडपल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, प्रभू रामाची निशाणी धनुष्यबाण आणि महायुतीची निशाणी धनुष्यबाण आहे. काहीजण राम राम करतात मात्र त्यांची अवस्था म्हणजे मुहं मे राम बगल में छुरी अशी झाली असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. शिवसेना नेते खासदार कृपाल तुमाने यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. । Eknath Shinde | Narendra Modi । Lok Sabha Election 2024