नेवासा (प्रतिनिधी) – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 726 व्या संजीवन समाधी सोहळयानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर आज सायंकाळी करण्यात आलेल्या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघाले.
या दीपोत्सवाप्रसंगी आज समर्पण फाउंडेशनचे डॉ. करण घुले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. संत ज्ञानेश्वर मंदिराचे ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या “पैस”खांबाची विधिवत पूजन करण्यात येऊन पैस खांबासह माऊलीसमोर पहिला दीप लावण्यात आला.
त्यानंतर ॐ आकाराच्या बनविण्यात आलेल्या प्रतिकृतीमध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर सुधीर फडके, डॉक्टर दिलीप पडघन, रमेश आनंद गिरी महाराज,गोपाल आनंद गिरी महाराज, कृष्णाजी महाराज, विवेकानंद आश्रम चे ज्ञानेश्वर महाराज, गायिका शिल्पा पुणतांबेकर, निवेदिका मेघना अभ्यंकर, तबला वादक तुषार अग्रे, डॉ.करणसिंह घुले, महेश मापारी,डॉ.संजय सुकाळकर व सर्व विश्वस्तांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
Satara : जिल्ह्यातील डोंगरी तालुक्याला विकास निधी देणार – मुख्यमंत्री शिंदे
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप पेटवून तो संत ज्ञानेश्वर मंदिरावर व मंदिरांचे पायऱ्यावर देखील दीप लावण्यात आले.आळंदी येथे संजीवन समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतांना माऊलीची कर्मभूमी असलेल्या नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये माऊलीचे मूर्तीमंत रूप असलेल्या “पैस”खांबास पहिला दीप अर्पण करून मंदिरावर 726 दीप भाविकांच्या हस्ते प्रज्वलित करून माऊलीला अभिवादन करण्यात आले.