चेन्नई – आयपीएलच्या सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत चेन्नईला प्रथम फलंदाजीस पाचरण केलं होतं.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 218 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. चेन्नईने 20 षटकांत सात गडी गमावून 217 धावा केल्या आहेत.
Innings Break!@ChennaiIPL post a commanding total of 217/7 on board!
Can @LucknowIPL chase this down to bag their second win of the season❓
Stay tuned for the second innings!
Scorecard ▶️ https://t.co/buNrPs0BHn#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/sM1foAuWW4
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
ऋतुराज गायकवाडने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने 31 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. यादरम्यान गायकवाडने तीन चौकार आणि चार षटकार मारले. याव्यतिरिक्त कॉनवे याने 29 चेंडूत 47 धावा केल्या. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. गायकवाड आणि कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 9.1 षटकात 110 धावांची भागीदारी केली.
#IPL2023 #CSKvLSG : लखनौचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11
शिवम दुबेने 16 चेंडूत 27 धावा केल्या. मोईन अलीने 13 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तीन चेंडूंचा सामना केला. त्याने पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवर मार्क वुडने त्याला आयुष बडोनीकरवी झेलबाद केले. धोनीचा स्ट्राईक रेट 400 होता. बेन स्टोक्स आठ आणि रवींद्र जडेजाने तीन धावा करून बाद झाले. अंबाती रायडू 14 चेंडूत 27 धावांवर तर मिचेल सँटनर एका धावेवर नाबाद राहिला. रायडूने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.
#IPL2023 : सर्वात महागडे खेळाडू ठरले सुपरफ्लॉप, पहिल्याच सामन्यात…
लखनऊ सुपर जायंट्सकडून गोलंदाजीत मार्क वुड आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. आवेश खानला एक विकेट घेता आली.