चेन्नई :- आयपीएलच्या सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईचा संघ 2019 नंतर प्रथमच त्यांच्या घरच्या मैदानावर उतरणार आहे. चेन्नई वि. लखनौ या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूनं लागला आहे. (Lucknow Super Giants won the toss and elected to field) लखनौ सुपर जायंट्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून चेन्नईच्या संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
Singams will be batting first.! 🏏#CSKvLSG #WhistlePodu #Yellove 💛🦁
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 3, 2023
कर्णधार केएल राहुलने संघात एक बदल केला आहे. त्याने डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या जागी यश ठाकूरची संघात निवड केली आहे. त्याचवेळी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघात कोणताही बदल केला नाही.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 पुढीलप्रमाणे –
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, दीपक हुडा, क्रुणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, मार्क वुड, रवी बिश्नोई, यश ठाकूर, आवेश खान.
Take a look at the Playing XIs for the #CSKvLSG contest!
What do you make of the two sides tonight 🤔
Follow the match ▶️ https://t.co/buNrPs03RP#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/SdE1lyoI09
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
चेन्नई सुपर किंग्ज : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगेरगेकर.