IPL 2024 (KKR vs LSG Match 28) :- इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्स फ्रँचायझीचा प्रवेश 2022 मध्ये झाला होता. त्यानंतर आयपीएलमध्ये लखनौविरुद्ध अनेक विक्रम झाले आणि मोडले गेले. लखनौला पराभूत करून केकेआरने चालू मोसमातील चौथा विजय नोंदवला आहे, ज्यामध्ये फिलिप सॉल्ट आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
ईडन गार्डन्सवर झालेल्या लखनौ विरुद्ध कोलकाता सामन्यात अय्यर आणि सॉल्ट यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 120 धावांची भागीदारी झाली. यासह, अय्यर आणि सॉल्टची जोडी आता लखनौ (LSG)विरुद्ध आयपीएलमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
एकीकडे फिलिप सॉल्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि सामन्यातील विजयी शॉटही त्याच्या बॅटमधूनच आला. सॉल्टने 47 चेंडूत 89 धावा केल्या, त्याच्या खेळीत 14 चौकार आणि 3 षटकारांचाही समावेश आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने 38 चेंडूंत 6 चौकारांसह 38 धावांची खेळी केली. दोघांनी 120 धावांची भागीदारी रचून केकेआरला विजय मिळवून दिला.
I. C. Y. M. I
🔊 Sound 🔛!
That 9⃣8⃣m SIX from Phil Salt 🔥
Watch #TATAIPL LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#KKRvLSG | @KKRiders | @PhilSalt1 pic.twitter.com/joJJO61qzA
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2024
लखनौ (LSG) विरुद्ध कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीच्या बाबतीत, फक्त शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा ही जोडी अय्यर आणि सॉल्टच्या पुढे आहे. गिल आणि साहा यांनी आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये लखनौ (LSG) विरुद्ध पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली होती. या यादीत आरसीबीचे फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या जोडीचाही समावेश आहे, ज्यांनी 2023 मध्ये लखनौ संघाविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 115 धावा जोडल्या होत्या.
IPL 2024 ( KKR vs LSG ) : लखनौचे करोडो रुपये पाण्यात? दीपक हुड्डा पुन्हा एकदा ठरला फ्लॉप….
केकेआर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम…
श्रेयस अय्यर आणि फिलिप सॉल्टच्या नाबाद 120 धावांच्या भागीदारीमुळे कोलकाता नाइट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सचा 8 विकेट्स राखून पराभव केला. IPL 2024 मध्ये KKR चा 5 सामन्यांमधला हा चौथा विजय होता, ज्यामुळे संघ 8 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. फक्त राजस्थान रॉयल्स त्यांच्या पुढे आहे, ज्यांचे सध्या 10 गुण आहेत.