नवी दिल्ली – ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या 16 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अशी ओळख असलेल्या आयपीएलच्या जवजवळ प्रत्येक हंगामात काही ना काही लहान-मोठे बदल पाहण्यास मिळाले आहेत. जगातील सर्वात चर्चेत असणारी ही क्रिकेट लीग 2008 मध्ये सुरु झाली.
या आयपीएलच्या माध्यमातून अनेक खेळाडू लखपती, करोडपतीही झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या आयपीएलमध्ये अनेक देशांचे खेळाडू सहभाग होत असतात. आणि ते त्यांच्या खेळाने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करतात.
मात्र, या पलीकडे क्रिकेट चाहत्यांवर भोजपुरी भाषेतील कमेंट्रीने मोहिनी घातली असल्याचं दिसून आलं आहे. या भोजपुरी भाषेतील विनोदी गोडव्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी या कमेंट्रीला डोक्यावर घेतलं आहे. यंदाचा हंगामात 12 भाषांमध्ये प्रेक्षकांना कमेंट्रीचा अनुभव प्रेक्षकांना मिळत आहे. या 12 भाषेंच्या तुलनेत भोजपुरी भाषेतील कमेंट्री क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीस पडली असून, सगळीकडे याच कमेंट्रीची हवा पाहायला मिळतेय.
Ravi Kishan doing bhojpuri commentary in the IPL 2023 on Jio Cinema – So good to hear the bhojpuri commentary! pic.twitter.com/koj1pcRkrY
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 1, 2023
‘रवी किशन, मोहम्मद सैफ, शिवम सिंह, सत्य प्रकाश, गुलाम हुसैन आणि सौरभ वर्मा’ असे सहा जण भोजपुरी भाषेत कमेंट्रीचा तडक लागवताना दिसत आहेत. यापैकी अभिनेता आणि खासदार ‘रवी किशन’ हा भोजपुरी कमेंट्री करतोय. भोजपुरी भाषा आणि त्याला असलेला देसी तडका यामुळे ही कमेंट्री आणखी रंगतदार होतेय.
भोजपुरी एक्टर रवी किशन याच्या कमेंट्रीत असेलेल काही ठराविक शब्दांची चर्चा होताना दिसत आहेत. जसे की.. “ई का हो, मुंह फोडबा का?, ‘सट्ट से अंदर घुस गइल…’, ‘अउर हई देखबा..’ असे हटके डायलॉग ऐकायला मिळत आहेत. दरम्यान, आपल्याला भोजपुरी भाषेत कमेंट्री करण्याची संधी दिल्या बद्दल रवी किशन याने सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर करत जिओ सिनेमाचे आभार मानले आहेत.