FIH Pro League 2023-24 ( Indian women’s hockey squad) : भारतीय महिला हॉकी संघात मोठा बदल करण्यात आला आहे. अनुभवी गोलकीपर सविता पुनियाच्या ( Savita Punia ) जागी मिडफिल्डर सलीमा टेटे ( Salima Tete ) हिला या महिन्याच्या अखेरीस FIH प्रो लीगच्या बेल्जियम आणि इंग्लंड लेग (चरण)साठी भारताच्या 24 सदस्यीय महिला हॉकी संघाची कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर नवनीत कौरला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
यापूर्वी ऑलिम्पिक पात्रता आणि त्यानंतरच्या प्रो लीग सामन्यांमध्ये सविता भारताची कर्णधार होती. सलीमाला अलीकडेच हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कारांमध्ये बलबीर सिंग सीनियर फिमेल प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे.
हॉकी इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सलीमा म्हणाली, ” मला संघाचे कर्णधारपद देण्यात आले याचा मला आनंद आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि मी त्याबद्दल उत्सुक आहे. आमच्याकडे अनुभवी आणि युवा खेळाडूंचा मजबूत संघ आहे. आम्ही एफआयएच प्रो लीगच्या आगामी बेल्जियम आणि इंग्लंड टप्प्यात आमची सर्वोत्तम कामगिरी करू. आम्हाला आमच्या कमकुवत बाजूवर मात करायची आहे.”
बेल्जियममध्ये 22 ते 26 मे आणि इंग्लंडमध्ये 1 ते 9 जून दरम्यान सामने होणार आहेत. पहिल्या टप्प्यात भारताचा सामना अर्जेंटिना आणि बेल्जियमशी दोनदा होणार आहे. लंडन टप्प्यात हा संघ ब्रिटन आणि जर्मनीशी खेळेल. प्रो लीग टेबलमध्ये भारत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.
Squad Announcement Alert!📢
Here’s the squad of the Indian Women’s Hockey Team set to dominate the Belgium and England legs of the FIH Pro League 2023-24. 🏑
Catch them in action in Belgium from May 22nd to May 26th and in England from June 1st to June 9th.🇮🇳
You can watch… pic.twitter.com/eNMgixkvPv
— Hockey India (@TheHockeyIndia) May 2, 2024
भारतीय महिला संघ खालीलप्रमाणे…
गोलरक्षक : सविता पुनिया, बिचू देवी खरीबम.
बचावपटू : निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, मोनिका, ज्योती छत्री, महिमा चौधरी.
मिडफिल्डर : सलीमा टेटे (कर्णधार), वैष्णवी विठ्ठल फाळके, नवनीत कौर, नेहा, ज्योती, बलजीत कौर, मनीषा चौहान, लालरेमसियामी.
फॉरवर्ड : मुमताज खान, संगीता कुमारी, दीपिका, शर्मिला देवी, प्रीती दुबे, वंदना कटारिया, सुनीलिता टोप्पो, दीपिका सोरेंग.