पुसेगाव – श्री सेवगिरी महाराजांच्या 72 व्या पुण्यस्मरणनिमित्त पुसेगाव (ता. खटाव) येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्वान शर्यतीत सातारा कोरसिंग क्लब यांचा “चोरकला’ हा काळ्या रंगाचा नर श्वान प्रथम क्रमांक मिळवून चॅम्पियन ठरला.
सातारा दहिवडी रस्त्यालगत रविवारी झालेल्या या स्पर्धेत सातारा, सोलापूर, सांगली या भागातील श्वानांनी सहभाग घेतला होता. अत्यंत अटीतटीच्या लढती असल्याने या स्पर्धेची फायनल फेरी दुसऱ्या दिवशी सोमवारी घेण्यात आली. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदीप जाधव, विकास जाधव, सचिन जाधव, राजेंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेतील अनुक्रमे विजयी श्वान, श्वानाचा रंग व त्याचे मालक पुढील प्रमाणे –
पुसेगाव येथील शशिकांत देशमुख यांचा “राजमुद्रा’, उबंरमळे येथील रणजित वलेकर यांचा “लक्ष्मी’, विजापूर येथील विलास राठोड यांचा “बॅरल’, पंढरपूर येथील पै. हणमंत अभंगराव यांचा “शबनम’, शेरे येथील मोरगा ग्रुपचा “गरुडा’, मरळी येथील प्रसाद पाटील यांचा “ब्लॉककॅट’, चितळी येथील संतोष मस्कर यांचा “वॉन्टेड’, पारगाव येथील वैभव शेडगे यांचा “कस्तुरी’, निढळ येथील अद्याय पवार यांचा “युवराज’, पुसेसावळी येथील बिगब्रदर ग्रुपचा “सुब्रो’, खटाव येथील गोल्डन ग्रुपचा “डायना’, पुसेसावळी येथील तुळजाभवानी यांचा “शंभू नारायण’, मरळी येथील मराठा ग्रुप यांचा “वाईन’, चिंचणेर येथील सरपंच संतोष जाधव यांचा “क्रिस्टल’ या श्वानांनी यश मिळविले. दरम्यान, सर्व विजेत्या श्वान मालकांना सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्यावतीने बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रकाशबुवा महागावकर यांनी केले.