वडूज – येथील नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडी नुकत्याच बिनविरोध पार पडल्या. यामध्ये बांधकाम सभापती पदी अनिल माळी, वित्त व नियोजन सभापती पदी सौ. मंगल काळे, महिला व बालकल्याण सभापती पदी सौ. सुवर्णा राजेंद्र चव्हाण, स्वच्छता/पाणीपुरवठा सभापती सौ. किशोरी अजित पाटील, स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील गोडसे यांच्या निवडी बिनविरोध निवडी पार पडल्या.
यावेळी नूतन सभापतीचे आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, दिलीपराव येळगावकर हिंदुराव गोडसे (आण्णा) यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी नगराध्यक्षा शोभा माळी, महेश गुरव, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, विपुल गोडसे, वचनशेठ शहा, संदीप गोडसे, प्रदीप खुडे, सुनीता कुंभार, काजल वाघमारे, शुभांगी जाधव, नीता गोडसे, स्वीकृत नगरसेवक निलेश गोडसे, संदीप गोडसे उपस्थित होते. निवडीची प्रक्रिया जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार व मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पार पाडली.