मुंबई – कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत.
दरम्यान, या अशा परिस्थिती पोलिस आणि डॉक्टर हे दिवसातील कित्येत तास काम करत आहेत. काम करताना कोरोनाची लागण देखील होऊ शकते याची त्यांना चांगली कल्पना असली, तरी ते आपले काम खूपच चांगल्याप्रकारे करताना दिसत आहे.
दरम्यान, त्यांच्या या कामासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांना या सर्वांचे आभार मानले आहेत. या कलाकारांनी अत्यंत सकारात्मक ऊर्जा देणारा एक व्हिडिओ तयार केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.