पुणे – किरकोळ काम किंवा विनाकारण फिरणाऱ्या 200 जणांना स्वारगेट पोलिसांनी गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यापैकी सत्तरहून अधिक जणांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध 144 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तर, 100 हून अधिक वाहने जप्त केली.
शहरात संचारबंदीचे उल्लंघन करत फिरणाऱ्यांवर गुरुवारी सकाळ कारवाईचा बडगा उगारला. शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी किंवा किंवा शहराच्या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी स्वारगेट येथील जेधे चौकातून पुढे जावे लागते. त्यादृष्टीने स्वारगेट पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून चौकातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडविण्यास सुरुवात केली. पोलिसांकडून अधिकृत परवानगी घेतलेले व अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्ती वगळता इतर नागरिकांवर गुन्हे दाखल केले.