पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या सांगता सभेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी,
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी ही माहिती दिली.
११ मे रोजी सकाळी १० वाजता नातूबाग येथे ही सभा होणार आहे, तर त्याच दिवशी सांयकाळी समारोपाची सभा शिवाजीनगर येथे होणार असून, त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. उद्या (शुक्रवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सारसबाग येथे सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे.