IPL 2024 (GT vs CSK Match 59) : आयपीएलच्या 59व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज (शुक्रवार, 10 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सामना होणार आहे. गुजरातकडे मोसमात साध्य करण्यासाठी काहीच उरले नाही, त्याच्या प्लेऑफच्या आशा आता संपल्या आहेत.
त्याचवेळी चेन्नईला प्लेऑफचे तिकीट मिळण्याची प्रतीक्षा आहे. चेन्नई गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. सलग पराभवानंतर गुजरात तळाला गेला आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा पुढचा प्रवास संपला आहे. या सामन्यात गुजरात निर्भयपणे खेळणार आहे, त्यामुळे चेन्नईला सावध खेळी करावी लागणार आहे, कारण प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी हा विजय चेन्नईसाठी खूप महत्त्वाचा आहे.
चेन्नई सुपर किंग्जने 11 सामने खेळले असून, 6 सामने जिंकले आणि 5 सामने गमावले. संघाचे 12 गुण असून ते चौथ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्सने 11 सामने खेळले असून, 4 जिंकले आहेत आणि 7 सामने गमावले आहेत. संघ दहाव्या क्रमांकावर आहे.
चेन्नईने आपले शेवटचे दोन सामने पंजाब किंग्जविरुद्ध खेळले आहेत. दुसऱ्या सामन्यात चेन्नईने पंजाबचा पराभव केला. त्याचवेळी गुजरातला गेल्या 3 सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलग दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. यामुळे संघ गुणतालिकेत तळाला गेला.
गुजरात आणि चेन्नई यांच्यातील स्पर्धा तुल्यबळ आहे. दोन्ही संघ 6 वेळा आमने-सामने आले आहेत, त्यापैकी गुजरातने 3 सामने जिंकले आहेत आणि चेन्नईने 3 सामने जिंकले आहेत, परंतु सध्या चेन्नईचा वरचष्मा आहे.