#Budget_2021 : जानेवारीत विक्रमी ‘जीएसटी’ संकलन

नवी दिल्ली – लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानेअर्थव्यवस्था हळूहळू रुळावर होत असल्याचे संकेत आहेत. जानेवारी महिन्यात वस्तू व सेवा करातून विक्रमी १.२० लाख कोटींचा महसूल मिळाला. विशेष बाब म्हणजे हा आकडा जीएसटी (GST) लागू झाल्यानंतरचा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

जानेवारीतील हे ‘जीएसटी’ संकलन गेल्या वर्षीच्या (२०२०) जानेवारीच्या महसूलापेक्षा आठ टक्क्यांनी अधिक आहे. जुलै २०१७ मध्ये ‘जीएसटी’ लागू झाल्यापासूनचे हे सर्वाधिक करसंकलन असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. सलग चौथ्या महिन्यात ‘जीएसटी’ संकलन एक लाख कोटींहून अधिक झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये ‘जीसटी’ संकलन १,१५,१७४ कोटी इतके होते.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये ३२,१७२ कोटी रुपये गोळा झाले असून हा अत्यंत कमी गोळा झालेला जीएसची महसूल आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.