आर्थिक पाहणी अहवालावरून रोहित पवारांची मोदी सरकारवर खोचक टीका

नवी दिल्ली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा आणखी एक वार्षिक अर्थसंकल्प संसदेच्या दोन्ही सभागृहात  थोड्याच वेळात सादर केला जाईल. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये देशाला करोना महामारीने जोरदार दणका दिला असल्याने या अर्थसंकल्पामध्ये काय असणार, याबाबत निश्‍चित सर्वसामान्यांना उत्सुकता आहे.

यातच यंदाच्या  अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालातील एका मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार

“कोरोनाच्या सुरुवातीला मजूरवर्ग उन्हातान्हात चालत जाताना, नोकरदार पगाराअभावी हलाखीत जगत असताना केंद्र सरकारने मदत दिली नाही. कारण तेंव्हा दिलेली मदत वाया गेली असती, असं आर्थिक पाहणी अहवालातील निरीक्षण वाचून मन सुन्न झालं. असा विचार करणं कितपत योग्य आहे?” असं म्हणत मोदी सरकला खोचक सवाल विचारला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.