शिक्रापूर/सविंदणे -शिरूर तालुक्यात तीन-चार दिवसाआड करोनाबाधित आढळून येत आहे. गुरुवारी (दि. 4) शिक्रापूर व कवठे यमाईत प्रत्येकी एक-एक बाधित आढळून आला आहे.
हे दोघेही मुंबई येथून आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मुंबईकर पुन्हा डोकेदुखी ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा अलर्ट देण्यात आला आहे.