बॉलीवूडची अभिनेत्री तापसी पन्नू बेधडक आणि हटके स्वभावासाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. मात्र, कदाचित ती आता बोल्ड लूकसाठीसुद्धा ओळखली जाऊ शकते. तिचा आगामी थ्रिलर चित्रपट “हसीन दिलरूबा’चा रंजक ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये तापसी एकदम बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.
यापूर्वी अशा बोल्ड लूक कधीही पाहावयास मिळालेला नाही. म्हणूनच तिच्या या लूकची जोरदार चर्चा सुरू आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
“हसीन दिलरुबा’ हा एक रंजक आणि थ्रिलर कथानक असलेला चित्रपट आहे. तो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्याशिवाय अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेता हर्षवर्धन राणे हे निर्णायक भूमिकेत दिसणार आहेत.
View this post on Instagram
या चित्रपटात जहरी आणि लहरी असे त्रिकोणी प्रेम अर्थात लव्ह ट्रॅन्गल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात तापसी आणि विक्रांत हे दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही कथा या दोघांपासून सुरू होईल. मात्र याच दरम्यान तापसीच्या आयुष्यात हर्षवर्धन राणेची एन्ट्री होताना दिसेल आणि मग कथा अनोख्या वळणांवरून जाताना दिसणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच तापसी विक्रांतला प्रश्न विचारते की, “आपने दिनेश पंडित की किताब पी है..? क्या लिखते हैं, छोटे-छोटे शहरों में बड़े-बड़े कतल करा देते हैं, पता ही नहीं चलता,’. यानंतर तापसीच्या घरात एक मोठा ब्लास्ट होतो आणि यात तिच्या पतीचा मृत्यू होतो.
View this post on Instagram
दरम्यान, अर्थातच पोलिसांचा पहिला संशय तापसीवर जातो आणि मग पुढे. पुढे काय ..? हे पाहण्यासाठी तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल आणि जुलै महिन्याच्या 2 तारखेची वाट पाहावी लागेल. कारण येत्या 2 जुलै 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.