2020 वर्ष सलमानसाठी तसे स्लोच राहिले. फार काही कमाल धमाल त्याला करता आली नाही. मात्र 2021 मध्ये त्याच्या राधेमुळे त्याची चांगलीच चर्चा झाली. राधेच्या दर्जाबाबत बोलणे टाळले तर त्याने त्यात ज्यांनी ज्यांनी पैसा लावला होता, त्या सगळ्यांना पैसा वसूल करून दिल्याची बातमी आहे.
त्यामुळे सलमानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चर्चा सुरू आहे. पुढच्या वर्षी त्याचे सहा मोठे चित्रपट येत आहेत. त्यात किक 2, कभी ईद कभी दिवाली, अंतिम- द फायनल ट्रुथ आदींचा समावेश आहे.
मात्र, पुढच्या महिन्यांत तो दोन अगदी बड्या प्रोजेक्टसची घोषणा करणार असल्याचे सांगितले जाते आहे. दुसऱ्या चित्रपटाची बातमी मात्र लीक झाली आहे. साउथचा सुपरस्टार विजय याच्या मास्टरच्या रिमेकमध्ये सलमान झळकणार असल्याचे फायनल झाले आहे.
सलमानने या वर्षाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट पाहिला होता व त्याच्या रिमेकमध्ये काम करण्यास त्याने होकार दिला होता. मात्र नंतर राधेचे प्रदर्शन, करोना यामुळे पुढे सरकत नव्हते.
पण आता एका स्टुडिओने हा चित्रपट करण्याची तयारी सुरू केली असून चित्रपटाचा विषय आणि मुख्य स्टार फायनल झाले आहेत. आता दिग्दर्शक कोण आणि मास्टरमधील विजय सेतूपतीची भूमिका कोणाला द्यायची याची चाचपणी केली जाते आहे.