आजकाळ अनेक जण आपली कला सादर करण्यासाठी सोशल मीडियाचा सर्रास वापर करताना दिसतात. यात मुळातच असलेले कलाकारदेखील चाहत्यांची वाहवा मिळवण्यासाठी सोशल मीडियावर कधी फोटो, तर कधी व्हिडिओ शेअर करत असतात.
View this post on Instagram
अभिनेत्री किशोरी शहाणेदेखील सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्यादेखील आपले फोटो, व्हिडिओ आणि अगदी व्हॅकेशनबद्दल सोशल मीडियावर माहिती शेअर करत असतात. नुकताच त्यांचा नऊवारी साडीतला एक भन्नाट डान्स व्हिडिओ वायरल झाला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला असून सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, यात नऊवारी साडी परिधान केलेल्या किशोरी शहाणे माधुरीच्या “बडी मुश्कील बाबा बडी मुश्किल’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
View this post on Instagram
त्यांचा हा हटके अंदाज आणि बिटपूर्वक डान्स त्यांच्या चाहत्यांना भावला आहे. किशोरी अफलातून नृत्यांगना आहेत यात काही वादच नाही. त्या नेहमीच आपल्या सुंदर अभिनयासोबत तालबद्ध नृत्यशैलीसाठी प्रसिद्ध राहिल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, “मोरूची मावशी’ या सुप्रसिद्ध व्यावसायिक नाटकाने त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे सर्व स्तरावर कौतुक झाले. त्यानंतर “प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली.
View this post on Instagram
पुढे त्यांनी एकापेक्षा एक हटके आणि सुपरहिट चित्रपट दिले. किशोरी शहाणे यांनी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले आहे. सध्या त्या “गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेत काम करत आहेत.