नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करप्रमुख जनरल मनोज सी पांडे यांच्या नियुक्तीला महिनाभराची मुदतवाढ मंजूर केली आहे. लष्करी नियम १९५४ च्या नियमांतर्गत लष्करप्रमुख जनरल मनोज सी पांडे
३१ मे २०२४ रोजी सेवा निवृत्त होणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या सेवेत त्यांच्या सामान्य सेवानिवृत्ती वयापेक्षा एक महिन्याच्या अधिक कालावधीसाठी म्हणजे ३० जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे.
जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुख म्हणून ३० एप्रिल २०२२ रोजी नियुक्ती झाली होती. डिसेंबर १९८२ मध्ये त्यांची बॉम्बे सॅपर्समध्ये नियुक्ती झाली. लष्करप्रमुख म्हणून पदभार स्विकारण्यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कामकाज पाहिले होते.