BJP Candidate List। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली १९५ उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली होती. या यादीतून अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट करण्यात आलाय. तर दुसरीकडे काही ज्येष्ठ नेत्यांच्या नावांच्या बाबतीत सस्पेन्स कायम ठेवण्यात आलाय. दरम्यान, आता पक्षाकडून निवडणुकीसाठी दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये राहिलेल्या राज्य आणि नेत्यांचा समावेश होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
दोन दिवस भाजपच्या कोअर कमिटीची बैठक BJP Candidate List।
उर्वरित लोकसभेच्या तिकिटांबाबत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज पार पडणार आहे. यादरम्यान पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारच्या उर्वरित जागांसाठी आज आणि उद्या या दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. दोन दिवस दिल्लीत कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहू शकतात. कोअर ग्रुपच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी नावांवर विचारमंथन होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गजांना बाजूला करण्यात आले. आता दुसऱ्या यादीबाबतही चर्चा रंगली आहे. दुसऱ्या यादीत पक्ष मोठ्या प्रमाणात तिकीट कापण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. या बैठकीत दुसऱ्या यादीतील नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यानंतर ७ किंवा ८ मार्च रोजी दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि राजस्थानसह अनेक राज्यांची नावे असण्याची शक्यता वर्तवलीय.
उमेदवारांची तिकिटे कापली जाणार का? BJP Candidate List।
पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत वादग्रस्त विधाने करणाऱ्या खासदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर, रमेश बिधुरी आणि प्रवेश वर्मा या खासदारांच्या नावांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीतील वादग्रस्त चेहरेही पक्ष दूर करू शकतो. यामध्ये सर्वात ठळक नाव आहे ते कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे.
महिला कुस्तीपटूंनीही ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. सुलतानपूर आणि पिलीभीतच्या जागांवरही उमेदवार बदलण्याची चर्चा आहे. मनेका गांधी आणि वरुण गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांबाबत दुसऱ्या यादीत काय होते हे पाहणे गरजेचे आहे.