Lok Sabha Election 2024 । देशाचे गृहमंत्री अमित शहा जळगाव दौऱ्यावर आले होते. अमित शाह मागील दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाह यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. या दौऱ्यात अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जागावाटपावर चर्चा केली.
मागील काही दिवसात चर्चा अशी होती की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १६ जागा मागितल्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मात्र अमित शाह यांनी मुंबईत बैठकीत जागावाटपात तिढा सोडवल्याचे दिसून आले. अमित शाह मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत पोहोचले.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शाह यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथून आले. शाह यांनी अन्य चौघांसोबत सह्याद्री अतिथिगृहावर रात्री उशिरापर्यंत चर्चा केली.
वृत्तानुसार यावेळी बैठकीत जागावाटपावरून जिथे भाजपपेक्षा मित्रपक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, तेथे भाजपनेदेखील एक पाऊल मागे घेतले पाहिजे, असे शाह म्हणाल्याचे समजते. मिळलेल्या माहितीनुसार, भाजपने केलेली सर्वेक्षणे, राज्यातील महायुतीची व महाविकास आघाडीची परिस्थिती, महायुतीत कोणत्या मतदारसंघात निवडून येण्याची कोणत्या पक्षाची क्षमता आहे, हे मुद्दे लक्षात घेऊन जागावाटप होणे आवश्यक असल्याचे मत शाह यांनी मांडले.
अमित शाह यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सल्ला दिल्याचे समजते आहे, ते म्हणाले,’हट्ट सोडा असे केवळ आपल्या दोघांनाच माझे म्हणणे नाही. भाजपचे नेतेदेखील अशा काही जागांसाठी अडून बसले असतील की जिथे भाजपपेक्षा मित्रपक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, तेथे भाजपनेदेखील एक पाऊल मागे घेतले पाहिजे, असे शाह म्हणाल्याचे समजते.
हेही वाचा
Pankaja Munde । पंकजा मुंडे भरसभेत अमित शाहसमोर बोलून गेल्या,’पडदा गिर चुका है…’