Rajinikanth Viral Video| जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगला बॉलीवूडची अनेक मंडळी सहभागी झाली होती. बॉलीवूडच्या तीन खानने यावेळी केलेला एकत्र डान्स देखील चांगलाच चर्चेत आला आहे. या सोहळ्याला साऊथचे सुपरस्टार अभिनेते रजनीकांत देखील उपस्थित राहिले होते. मात्र प्री-वेडिंगवरून परतत असतानाचा रजनीकांत यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यातील एका कृतीमुळे रजनीकांत यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंगमध्ये पापाराझींनी विमानतळाबाहेर हजेरी लावली होती. त्यावेळी पाहुण्याचं फोटोशूट सुरू असताना रजनीकांत यांनी एन्ट्री केली. फोटो घेण्यासाठी रजनीकांत यांनी पोज दिली. त्यावेळी त्यांनी कुटूंबाला देखील फोटोमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी एक हाऊस हेल्पर महिला फोटोमध्ये येत होत्या. त्यावेळी रजनीकांत यांनी हाताने इशारा करत हाऊस हेल्पर महिलेला बाजूला उभं राहण्यास सांगितले. त्यांची ही कृती नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेली नाही. Rajinikanth Viral Video|
Disgusting behaviour by the so called ‘superstar humanitarian’ #Rajinikanth chasing his luggage-carrying helper away for photo at the Ambanis wedding function. Real face of this shameless man masquerading as a spiritualist.#AmbaniWedding #AmbaniPreWedding #AnantAmbani pic.twitter.com/2BuOcYZvh3
— Ajay AJ (@AjayTweets07) March 3, 2024
रजनीकांत यांनी महिलेला बाजूला होण्यास सांगितल्याने अनेकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रजनीकांत यांना नेटकरी ट्रोल करत आहेत. ‘रजनीकांत तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती’, असं एका नेटकऱ्याने म्हंटले आहे. तर काहींनी रजनीकांत यांना पाठिंबा देखील दिला आहे. दरम्यान, अनेकदा रजनीकांत यांचा साधेपणा चाहत्यांच्या पसंतीस पडत असतो. त्यांच्या साध्या राहणीमानाचे अनेकजण कौतुक करतात. अनेकजण त्यांना देवाप्रमाणे मानतात. परंतु त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. Rajinikanth Viral Video|