Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यातील मतदानासाठी प्रचार सभा घेतल्या जात आहेत. यादरम्यान 1993 च्या बॉम्बस्फोटचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान सहभागी झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
मुसा उर्फ बाबा चव्हाण हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचार रॅलीत दिसून आला. यावरून भाजपने थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
भाजप आमदार अमित साटम म्हणाले की, “बुधवारी संध्याकाळी अंधेरी पश्चिम येथे मविआ उमेदवार अमोल किर्तीकरांच्या प्रचारात १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान उतरला होता. किर्तीकरांच्या समर्थनार्थ हा रॅलीत होता. त्यामुळे ही लढाई राष्ट्रवादीविरोधात तुकडे तुकडे गँगशी आहे आणि ही लढाई भारत पाकिस्तानची झाली असून मुंबईकरांच्या मारेकऱ्यांसोबत काँग्रेसचा हात आणि मुंबईला जाळणारी मशाल कोणती हे आता जनतेने ओळखावे.”
उद्धव ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती!
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ व समर्थनार्थ फिरताना दिसत आहे.
उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूबच्या…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) May 9, 2024
चंद्रशेखर बावनकुळे ट्वीट Lok Sabha Election 2024|
तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत म्हंटले की, “उद्धव ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती! 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ व समर्थनार्थ फिरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण, टीपू सुलतान, औरंगजेबाचा उदो उदो मोठ्या प्रमाणात झाला आणि आता थेट मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या आरोपीकडून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे.
“हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1993 च्या स्फोटानंतर मुंबईला संरक्षण दिलं, पण उद्धव ठाकरे याच स्फोटातील आरोपीची साथ घेत आहेत. आज वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? जनाब उद्धव ठाकरेंना थोडी तरी लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे तुमची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का?” असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे. Lok Sabha Election 2024|
हेही वाचा: