मुंबई – राज्यातील महविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून खातेवाटपही जाहीर झालं आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाची धूळ चारत प्रथमच विधानसभेवर निवडणून गेलेल्या धनंजय मुंडे यांना नव्या मंत्रिमंडळामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्रीपद देण्यात आले आहे.
आपल्या खात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वी आज धनंजय मुंडे यांनी प्रथम मुंबईतील चैत्यभूमीवर उपस्थिती लावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन केलं, यानंतर त्यांनी मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास देखील भेट देत अभिवादन केले.
याबाबत धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे माहिती देताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेला समता, बंधुता आणि एकात्मतेचा पाया अधिक भक्कम करण्याची शपथ घेतल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास विनम्र अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेला समता, बंधुता आणि एकात्मतेचा पाया अधिक भक्कम करण्याची मी शपथ घेतली. pic.twitter.com/eEm44qdzLR
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 6, 2020
महाविकास आघाडी सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास भेट देत त्यांचा आशीर्वाद घेतला.माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे जयंतीदिनी दर्शन घेत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/7WQbmk3bOG
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 6, 2020