Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी झाली असून २५ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये दिल्लीतील सात मतदारसंघांसह ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
अधिसूचनेनुसार या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची ६ मे ही अंतिम तारीख आहे. ९ मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
या टप्प्यात दिल्लीशिवाय हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे आतापर्यंत दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व सातही मतदार संघात एकाचवेळी मतदान होणार असून त्या जागांसाठी राजकीयपक्षांनी या आधीच आपला प्रचार सुरू केला आहे.