दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी निकाल लागतील. दिल्लीत पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी तारखांची घोषणा केली.
निवडणुकीची अधिसूचना 14 जानेवारी रोजी जारी केली जाईल. 21 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 24 जानेवारीपर्यंत नावे मागे घेता येतील. तारखा जाहीर झाल्याने तातडीने दिल्लीत आचारसंहिता लागू होईल. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे. 22 फेब्रुवारीपूर्वी दिल्लीत संभाव्य नवीन सरकार स्थापन होणार आहे. दिल्ली विधानसभेत रंगात लढती पाह्यला मिळतील. काँग्रेस आम आदमी पक्ष आणि भाजप हे पक्ष निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
दिल्लीत मतदानासाठी तेरा हजार सातशे 57 मतदान केंद्रे तयार केली गेली आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार दिल्लीत एक कोटी 46 लाख मतदार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी 90 हजार कर्मचारी काम पाहणार आहेत.
2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपला धूळ चारत दिल्लीतील 67 जागा मिळवल्या होत्या. भारतीय जनता पक्षाने केवळ तीन जागा जिंकल्या होत्या. काँग्रेला तर आपले खातेही खोलता आले नव्हते.