बारामती (प्रतिनिधी) : बारामतीत तीन कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली असून आज दिवसभरात कोरोना संक्रमित यांची संख्या ७ वर पोहोचली आहे.
काल एकूण 69 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी एकूण 64 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून पाच जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त झालेल्या अहवालांपैकी बारामती शहरातील दोन व भिकोबा नगर येथील एक असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत.
बारामती शहरांमध्ये 66 वर्षीय (रा. बागवान वस्ती, जळोची) पुरुषाचा तसेच आमराई परिसरातील 64 वर्षीय इसमाचा व भिकोबा नगर येथील यापूर्वी पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या पत्नीचा (54 वर्षे) अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. असे एकूण 64 पैकी आज बारामती मध्ये 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
बारामती शहरातील जीवनावश्यक वस्तूंची सेवा दुपारी एकपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण बाजारपेठेत गर्दी करु नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.