पुणे – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पतीने कॅल्शियमच्या गोळ्यामधून ब्लेडचे तुकडे खायला घातले होते. या प्रकरणात पती सोमनाथ साधु सपकाळ (वय ४५) याला सत्र न्यायाधीश एस.बी.राठोड यांनी जामीन मंजुर केला आहे.
त्याने अॅड. अभिषेक हरगणे, अॅड. ओंकार फडतरे, अॅड. अजिंक्य पोळ आणि अॅड. चैतन्य अभंग यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. ही घटना नोव्हेंबरमध्ये घडली आहे. याबाबत ४१ वर्षीय पत्नीने उत्तमनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.
त्याला १४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे. त्याच्याकडून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी अॅड. अभिषेक हरगणे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.