Ram Mandir Ayodhya Flight: एअर इंडिया एक्सप्रेसने 30 डिसेंबरपासून अयोध्या ते दिल्ली फ्लाइट चालवण्याची घोषणा केली आहे. 30 डिसेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. तर 16 जानेवारीपासून विमान कंपनी दिल्ली-अयोध्या मार्गावर दररोज विमानसेवा चालवणार आहे. राम मंदिर दर्शनासाठी दिल्लीतून अयोध्येला जाणे सोपे होणार आहे.
अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळावर A-321/B-737 प्रकारच्या विमानांसाठी विस्तारित धावपट्टी तयार करण्यात आली आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाच दिवस चालणार आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसचे उद्घाटन फ्लाइट IX 2789 दिल्लीहून सकाळी 11 वाजता उड्डाण करेल. हे विमान दुपारी 12.20 वाजता अयोध्येत उतरेल. तर अयोध्येहून परतीचे फ्लाइट IX 1769 दुपारी 12.50 वाजता निघेल आणि 2.10 वाजता दिल्लीत उतरेल.
एअर इंडिया एक्सप्रेस ही एअर इंडियाची उपकंपनी आहे. सुमारे 350 कोटी रुपये खर्चून अयोध्या विमानतळ पूर्ण झाले आहे. हे विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विकसित केले आहे. 16 जानेवारीपासून दिल्ली ते अयोध्या दैनंदिन विमान सेवा सुरु होणार आहे.
दरम्यान, इंडिगोने नुकतीच अयोध्या विमानतळावरून उड्डाणे चालवण्याची घोषणा केली होती. असे करणारी इंडिगो ही पहिली कंपनी ठरली. IndiGo ने अयोध्येचा 86 वे देशांतर्गत गंतव्य म्हणून समावेश केला आहे. इंडिगोचे विमान 30 डिसेंबर 2023 रोजी दिल्ली ते अयोध्येसाठी उड्डाण करेल. तर इंडिगोची दिल्ली-अयोध्या थेट विमानसेवा 6 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. इंडिगोने 11 जानेवारी 2024 पासून अहमदाबाद-अयोध्या दरम्यान उड्डाणे सुरू करण्याचीही घोषणा केली आहे.