Bachchu Kadu : राज्यात सध्या कारण विदर्भाच्या राजकारणात एकच गोंधळ पाहायला मिळत आहे. नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी निवडणुकीत प्रचारासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्यावरून ठाकूर यांनी राणा यांच्यावर दावा ठोकणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आता या दोघींच्या वादात आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी उडी घेतली आहे.
या प्रकरणावर आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी, “नवनीत राणा (Navneet Rana) यांनी जे विधान केलं, त्यावर आम्ही पत्र देणार आहोत. पैसे देणे आणि घेणे दोन्ही चूकच आहे. त्यांनी स्वत: म्हटले आहे कि त्यांनी पैसे दिले. याची चौकशी व्हायला पाहिजे आणि सत्य समोर यायला हवं, अशी मागणी कडू यांनी केली आहे.
तसेच पुढे बोलताना बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी ,”यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचं बरोबर आहे. स्वत: उमेदवार म्हणतोय की आम्ही पैसे दिले. मग पहिला दोषी कोण देणारा आणि घेणारा पण तेवढाच दोषी आहे. याची चौकशी झाली पाहिजे, असेही म्हटले आहे.
यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी लोकसभा निवडणुकीत आमचा प्रचार करण्यासाठी रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्याचा आरोप केला होता. त्यावरून राणा दाम्पत्याविरोधात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले आहे.