New Delhi : दिल्लीतील ग्रेटर नोएडा(greater-noida)मधील बांधकाम सुरू असलेल्या आम्रपाली सोसायटीत इमारतीची लिफ्ट( lift) कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लिफ्ट कोसळण्याने काही जण जखमी झाल्याचीही शक्यता आहे.
ग्रेटर नोएडातील बिसराख भागात गौर सिटी एक मूर्तीजवळ आम्रपाली ग्रुपचे बांधकाम सुरु आहे. शुक्रवारी सकाळी त्याठिकाणी कामगार बांधकाम साहित्य घेऊन लिफ्टमधून ( lift)वरून खाली येत होते.
याचदरम्यान अचानक लिफ्ट तुटली. त्यानंतर लिफ्ट जोरात खाली कोसळली. त्यामुळे लिफ्टमध्ये असणाऱ्या चारही मजुरांचा मृत्यू झाला. अपघात होताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, याबाबत पोलिस व सोसायटी सदस्यांना उपस्थितांनी लिफ्ट ( lift) कोसळल्याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील लिफ्ट तुटण्याचे कारण शोधले जात आहे.