entertainment news – ऑनलाइन पॉंझी घोटाळा प्रकरणी अभिनेता गोविंदाची चौकशी केली जाणार आहे. याबाबत ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलर टेक्नो अलायन्सने (एसटीए-टोकन) अनेक देशांमध्ये बेकायदेशीरपणे क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन पॉंझी घोटाळा केला. या कंपनीचे गोविंदा ने कथितरीत्या प्रमोशन व समर्थन केले होते. ( Actor Govinda to be questioned by Odisha EOW )
ऑनलाइन पॉंझी घोटाळ्यात ओडिशा गुन्हे शाखेने गोविंदा चे नाव चौकशीसाठी घेतले आहे. अभिनेत्याने काही प्रमोशनल व्हिडिओंमध्ये कंपनीचे प्रमोशन केले होते. याबाबत ईओडब्ल्यूचे महानिरीक्षक जे. एन. पंकज यांनी माहिती दिली. जुलैमध्ये गोव्यात एसटीएच्या भव्य समारंभात सहभागी झालेल्या तसेच काही व्हिडिओंमध्ये कंपनीची जाहिरात करणाऱ्या फिल्म स्टार गोविंदा ची चौकशी करण्यासाठी आम्ही लवकरच एक टीम मुंबईला पाठवू, असे ते म्हणाले. ( Actor Govinda to be questioned by Odisha EOW )
या प्रकरणात गोविंदा संशयित किंवा आरोपी नाही. त्याची नेमकी भूमिका तपासानंतरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले. जर आम्हाला तपासात आढळले की त्याची भूमिका त्यांच्या व्यावसायिक करारानुसार केवळ उत्पादनाच्या जाहिरातीपुरती मर्यादित होती, तर आम्ही त्याला आमच्या खटल्यात साक्षीदार बनवू, असे त्यांनी सांगितले. ( Actor Govinda to be questioned by Odisha EOW )
दरम्यान, याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचे देशासह ओडिशा प्रमुख गुरतेजसिंग सिद्धू , नीरोद दास यांना 7 ऑगस्ट रोजी
अटक केली आहे. भुवनेश्वरस्थित गुंतवणूक सल्लागार रत्नाकर पलाई यांना 16 ऑगस्ट रोजी सिद्धूशी संबंध असल्याबद्दल अटक करण्यात आली होती.
काय होती पोंझी योजना
या फसव्या कंपनीने भद्रक, केओंझार, बालासोर, मयूरभंज, भुवनेश्वर येथील सुमारे 10 हजार लोकांकडून 30 कोटी रुपये उकळले. याशिवाय बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, आसाम, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांमध्येही लोकांना लक्ष्य करण्यात आले. कंपनी लोकांना गुंतवणूक करण्यास सांगायची त्यासोबत गुंतवणूकदारांना त्यांच्यासोबत इतर लोकांना जोडण्यास सांगायची. लोक सामील झाल्यास प्रोत्साहन देण्याचे आश्वासनही तिने दिले. ( Actor Govinda to be questioned by Odisha EOW )