राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा पासून अनेक मुद्यावरून अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने आले आहे.अशात पुन्हा एकदा शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर मिश्किल टीका केली आहे. दरम्यान, नुकतेच कर्जत येथे पार पडलेल्या वैचारीक मंथन मेळाव्यातून अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर विविध आरोप केले.
तसेच अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख करत अजित पवारांनी टीका केली. यावर आता आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले,’आपल्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) खात्यावर पोस्ट लिहून अजित पवारांवर मिश्कील टिप्पणी केली.यासोबतच त्यांनी अजित पवार यांचा फोटोही शेअर केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच ट्विट
‘दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील पण हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. haha’
दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील पण हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. haha pic.twitter.com/mNdtUIeb79
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 5, 2023