औरंगाबाद : जंगलात आढळून येणारा बिबट्या औरंगाबाद शहरात दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील सिडको एन 1 या भागात बिबट्या आढळून आला आहे. रहिवासी भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाचे पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
Maharashtra: A leopard enters in Cidco N1 area in Aurangabad; Forest department officials and police present at the spot pic.twitter.com/rCYfsjtp6T
— ANI (@ANI) December 3, 2019
औरंगाबाद शहरातीस सिडको एन 1 हा भाग गजबजलेला भाग आहे. येथील काळा गणपती मंदिर परिसरात बिबट्या आढळून आला. बिबट्या येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या सध्या एका बंगल्याच्या आवारात असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याला पकडण्यासाठी संपूर्ण परिसर रिकामा करण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बिबट्याचे लोकेशन सापडले असून लवकरच त्याला ताब्यात घेऊ, असेही ते म्हणाले.