विषय समिती अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

पुणे – पुणे महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्यात आले. या पदांची मुदत संपली असून, 4 मे रोजी या पदांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे हे अर्ज दाखल करण्यात आले.

शहर सुधारणा समितीसाठी अध्यक्षपदासाठी भाजपने अमोल बालवडकर आणि उपाध्यक्षपदासाठी धनराज घोगरे यांना उमेदवारी दिली आहे. याच पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसकडून अनुक्रमे युवराज बेलदरे आणि रफिक शेख यांना उमेदवारी दिली आहे.

विधि समिती अध्यक्षपदासाठी भाजपने योगेश समेळ आणि उपाध्यक्षपदासाठी वीरसेन जगताप यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनुक्रमे योगेश ससाणे आणि बाळाभाऊ धनकवडे यांना उमेदवारी दिली आहे.

महिला बाल कल्याण समिती अध्यक्षपदासाठी भाजपने ज्योत्स्ना एकबोटे, तर उपाध्यक्षपदासाठी श्रद्धा प्रभुणे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने अनुक्रमे संजीला पठारे आणि लता राजगुरू यांना उमेदवारी दिली आहे.

क्रीडा समिती अध्यक्षपदासाठी भाजपने विजय शेवाळे, तर उपाध्यक्षपदासाठी महेश वाबळे यांना उमेदवारी दिली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनुक्रमे लक्ष्मी आंदेकर आणि भैय्यासाहेब जाधव यांना उमेदवारी दिले आहे. 4 मे रोजी महापालिका मुख्यसभेत या निवडणुका होतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.