गॅस सिलिंडर ६ रूपयांनी महागला

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक सुरु असतानाच सरकारने सर्वसामान्य व्यक्तींना गॅस सिलिंडर दरवाढीचा झटका दिला आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतीनंतर दिल्लीतल्या रहिवाशांना सबसिडीच्या सिलिंडरसाठी ५०२ रुपये मोजावे लागणार आहेत. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरसाठी ७३०हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. १ एप्रिललाही सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.