गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळली ३६ वाहने 

गडचिरोली – राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली आहे. सशस्त्र नक्षलवाद्यांनी तब्बल ३६ वाहने जाळल्याची घटना घडली. कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे घडली असून रस्त्याच्या कामासाठी या वाहनांचा वापर केला जात होता.

पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरु असून, हे काम दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट असून, दोन कार्यालयेही आहेत. तेथे अनेक वाहने होती. मंगळवारी रात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले. त्यांनी संपूर्ण गावभर शासनाविरोधात बॅनर लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली. या आगीत ११ टिप्पर, डांबर पसरविणारी मशिन, डिझेल व पेट्रोल टँकर, मोठे रोलर अशी तब्बल ३६ वाहने, मोठे जनरेटर व दोन कार्यालये जळाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.