Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज, ७ मे रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 93 जागांवर मतदान होत आहे. मंगळवार संध्याकाळपर्यंत 280 हून अधिक मतदारसंघांमध्ये मतदान झालेले असेल, म्हणजे एकूण लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर निर्णय झालेला असेल. उर्वरित चार टप्प्यात 263 मतदारसंघात मतदान होणार आहे.
तर राज्यातील लोकसभेच्या ११ जागांसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रातील निम्म्या जागांवरील (२४) मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल.
तिसऱ्या टप्प्यात बारामती, सातारा, माढा, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. त्या जागांसाठी एकूण २५८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य २ कोटींहून अधिक मतदार ठरवतील. पहिल्या २ टप्प्यांत मिळून राज्यातील १३ जागांसाठी मतदान झाले. राज्यातील मतदान प्रक्रिया ५ टप्प्यांत होणार आहे. चौथ्या टप्प्यात १३ मे यादिवशी ११ जागांसाठी, तर पाचव्या आणि अंतिम टप्प्यात २० मे यादिवशी १३ जागांसाठी मतदान होणार आहे.
Lok Sabha Election 2024। या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे
-गुजरात
-गोवा
-दादरा नगर हवेली आणि दमण-दीव
Lok Sabha Election 2024 । या क्षेत्रातील दिग्गज मुख्य उमेदवार यादी वाचा
तिसऱ्या टप्प्यात सुमारे 120 महिलांसह 1300 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा (गांधीनगर), ज्योतिरादित्य सिंधिया (गुणा), मनसुख मांडविया (पोरबंदर), पुरुषोत्तम रुपाला (राजकोट), प्रल्हाद जोशी (धारवाड) आणि एसपी सिंह बघेल (आग्रा) यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (विदिशा) आणि दिग्विजय सिंह (राजगढ) हे देखील यावेळी लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
Lok Sabha Election 2024 । हे वाचलं का ?
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
तिसऱ्या टप्प्यात मोदींच्या 10 मंत्र्यांचे ‘भवितव्य’ ठरणार; वाचा यादी
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात