जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११३ वर
सातारा (प्रतिनिधी) : साताऱ्यातील पाच आणि कराडमधील १३ अशा १८ जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आज दुसऱ्यांदा धक्का बसला. सकाळी तीन जणांचे रिपोर्ट पाँझिटिव्ह आले होते. त्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंतच २१ जण करोनाग्रस्त निष्पन्न झाले.
आज सातारा शहरातील सहा व कराड येथे १५ अशा २१ जणांचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११३ झाली आहे.