मुंबई – पुण्यात एक हिट अँड रनचे प्रकरण घडलय. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार याबाबत कुठेही भाष्य करताना दिसत नाहीत. शिवाय, आरोपीच्या वकिलांशी तुमचे संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला पाहिजे. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा. आता तुम्ही एखाद्या वकिलांचा संबंध याच्याशी जोडणार आहात. कोणीतरी चार ओळी छापल्या हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे, असं मला वाटतं नाही.
प्रत्येक ठिकाणी मीच भाष्य केलं पाहिजे, याची काही आवश्यकता नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबाबतची जबाबदारी पाळली आहे. आता या प्रकरणाला वेगळं स्वरुप देण्याची गरज नाही.