अंबाला – अंबाला येथे शुक्रवारी पहाटे मिनीबस आणि ट्रक यांच्यात धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत एका चिमुकल्यासह सात जणांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले. हा अपघात अंबाला-दिल्ली महामार्गावर मोहरा गावाजवळ घडला.
या बसमध्ये उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरात जाणारे सुमारे ३० प्रवाशी होते. हे सर्वजण नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.