Dalai Lama । Sukhvinder Singh Sukhu – हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शुक्रवारी तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांची धर्मशाला येथील मॅक्लॉडगंज येथील निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सुखू यांनी पत्रकारांना सांगितले की, दलाई लामा जेव्हाही धर्मशाळेला भेट देतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेण्याची आपली परंपरा आहे.
यावेळी आपल्याशी बोलताना दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेश हे एक “सुंदर राज्य” असल्याची प्रशंसा केली. तसेच सर्व धर्मांचा आदर करण्याची भारताची परंपरा महान असल्याचे विधानही त्यांनी आपल्याशी बोलताना केली असे मुख्यमंत्री सुखु म्हणाले.
धर्मशाला विधानसभा क्षेत्रात सुमारे ८०० तिबेटी निर्वासित मतदार म्हणून नोंदणीकृत आहेत.मुख्यमंत्र्यांनी दलाई लामा यांच्या एकूणच व्यवस्थेचीही माहिती घेतली आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.