– संदेश भिसे (प्रतिनिधी)
महाबळेश्वर – महाबळेश्वर येथील फळने वस्ती व कारवी आळा हा परिसर पूर्णपणे जंगलांनी वेढलेला असून येथे बऱ्याच वन्य जीवांचा वावर होत असतो. नुकतंच रात्री एक स्थानिक कुटुंब घरी परतत असताना त्यांना वाटेतच पूर्ण वाढ झालेल्या नर जातीच्या बिबट्याचे दर्शन झाले.
https://www.facebook.com/reel/2274662226070607
अगदी महाबळेश्वर शहराजवळ असणाऱ्या वस्तीपर्यंत बिबट्या येत असल्याची ही पहिलीच वेळ नसून या आधीही बऱ्याच भागात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. परंतु, आजपर्यंत बिबट्याकडून माणसावर हल्ला झाल्याचे कोणतीही घटना घडली नाही.
स्थानिक कुटुंबास बिबट्या दिसल्यानंतर कोणतेही नुकसान न पोहोचवता तो बिबट्या आपल्या वाटेने शांतपणे निघून गेला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सगळीकडे व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे.