मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी सर्वपरिचित आहेत. एका कार्यकर्त्याला सध्या असच समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने आपली नवी बुलेट अजित पवार यांना कौतुकाने दाखवली. यानंतर अजित पवारांनी बुलेट पाहिली आणि बुलेटला एकच सीट पाहून त्यांच्या स्टाईलने काही सवाल केले त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
कार्यकर्ता आपली नवी जावा बुलेट घेऊन अजित पवारांना दाखवायला आला. त्याने अजित पवारांना गाडीवर बसण्याचा आग्रह धरला. त्यावर अजित पवारांनी मला काहीही करायला लावतोयस, असं म्हणत बुलेटवर बसणं टाळलं. त्यानंतर कार्यकर्त्याने अजित पवारांच्या हस्ते बुलेटला चावी लावली आणि गाडीवर बसण्याचा आग्रह सुरूच ठेवला. फक्त बुलेटवर बसा, चालवू नका, असाही आग्रह केला. मात्र, अजित पवारांनी नको म्हणत बुलेटवर बसण्यास नकार दिला.
VIDEO: कार्यकर्त्याने उत्साहाने आपली नवी कोरी बुलेट दाखवली, मैत्रिणीचा उल्लेख करत अजित पवारांची टोलेबाजी@AjitPawarSpeaks#AjitPawar #Baramati pic.twitter.com/y5NZR6Rs2F
— Pravin Sindhu Bhima Shinde 🇮🇳✊ (@PravinSindhu) April 22, 2023
यानंतर अजित पवारांनी या बुलेटची किंमत विचारली, तसेच किती एचपीची बुलेट आहे अशीही चौकशी केली. कार्यकर्त्याने जावा बुलेट असल्याचं सांगितल्यानंतर अजित पवारांनी पूर्वीची जावा कंपनी तीच आहे का असं विचारलं. तसेच जावा आणि बुलेटच्या एचपीत आणि किमतीत किती फरक आहे याची माहिती घेतली.
यानंतर अजित पवारांनी या गाडीला एकच सीट आहे का असं विचारलं. यावर कार्यकर्त्याने ‘हो एकच सीट आहे’, असे उत्तर दिले. यानंतर अजित पवारांनी मैत्रिणीला न्यायचं असेल तर? असा प्रश्न विचारला. यानंतर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला.