मुंबई : आज शनिवारी नाशिक येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेनने सकाळी नाशिककडे रवाना झाले. यावेळी या प्रवासात सहप्रवासी असलेले एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्यातील राजकीय बदलानंतरही अजित पवार म्हणजे कामाचा माणूस असल्याचे कौतुकाचे शब्द या ज्येष्ठ नागरिकाने यावेळी काढले.
आज सकाळी वेळ सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने नाशिककडे प्रवास करत होते. या प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसून”दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर…अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा”… अशा भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा जे शक्य आहे, लोक हिताचे आहे ते करत राहणार, काही सूचना असतील तर करा असे सांगत आपल्या सोबत असणाऱ्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना त्यांची नोंद घेण्यास सांगितले. प्रवासात इतर प्रवाशांना त्रास होऊ नये, कोणाला अडवू नका अशा सूचना देखील अजित पवारांनी दिल्या.