पुणे – नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाली असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दादांनी गुप्त पद्धतीने काकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. एका व्यावसायिकाच्या घरी ही भेट झाल्याचे देखील बोलले जात आहे. या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केले आहे.
व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली.पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 3 आहे. या परिसरात 73 नंबरच्या बंगल्यात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे समजते. यामुळे आता अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. अशात अमोल मिटकरी यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना याचा कुणीही अन्वयार्थ लावू नये असं म्हंटल आहे.
भेट झाली अशी कन्फर्म माहिती माझ्याकडे नाही परंतु भेट झाली असेल तर ती पारिवारिक भेट असले. प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं यामध्ये काही नाही. ऋणानुबंध असतात भेट झाली असेल तर प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं यात काही नाही असं मिटकरी यावेळी म्हणालेत. तसेच काका पुतण्याची भेट झाली असेल तर कौटुंबिक भेट असेल त्याचा राजकीय अर्थ लावू नये असं देखील मिटकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी अजित पवार वेगळ्या गाडीतून मीडियापासून लपून जाताना कैद झाले यावर देखील मिटकरी यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले,सकाळी पाच वाजल्यापासून माणूस कामात असतो, झोप लागली असेल तर त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये असं देखील मिटकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं.