Ajit Pawar । बारामती लोकसभा मतदारसंघातील पवार विरुद्ध पवार लढत रंगतदार होणार हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक वाढताना दिसतीय. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष भाष्य करताना म्हटले होते की, मी संसदेत गेल्यानंतर माझा नवरा माझी पर्स सांभाळण्यासाठी कँटिनमध्ये येत नाही. मी मेरिटवर संसदेत गेलीय. असे म्हणत सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. याच टीकेला आता अजित पवारांनी उत्तर दिलंय.
आता अनेकांना फोन केले जातायेत Ajit Pawar ।
अजित पवार यांनी सध्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू केलाय. बारामतीत एका सभेत बोलताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंची नक्कल केली. यावेळी त्यांनी, “१५ वर्षांत कधी फोन नाही केला किंवा नीट बोलले नाहीत आणि आता कार्यकर्त्यांची विचारपूस केली जात आहे. अनेकांना फोन केले जात आहेत.”, असे सांगून अजित पवार यांनी नक्कल करून दाखविली. मी कुणालाही फोन करत नाही. मी सकाळपासून लोकांच्या कामाला लागतो. मला लोकांची सेवा करण्याची आवड आहे, असेही अजित पवार म्हणाले.
मी पर्स सांभाळायला कँटिनमध्ये जाणार नाही Ajit Pawar ।
पुढे बोलताना, “काम करायचं असेल तर जो नगराध्यक्ष असेल त्याच्याशी नगरसेवकाला गोडच बोलावं लागतं. तरंच निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांकडून कामं करून घ्यायची असेल तर आमदाराने त्यांना सन्मान द्यावा लागतो. वाचाळवीर होऊन राजकारणात काम होत नाही. टीका-टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कुणाची पर्स सांभाळायला संसदेत जाणार नाही”, असे उत्तर अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या कँटिनच्या टीकेवर केले.
त्यानंतर त्यांनी “संसदेत जाऊन सारखं मोदी-शाह यांच्यावर टीका केल्यामुळं तुम्हाला कोण सांभाळून घेणार. संसदेत नुसती भाषणं करून चालत नाही, लोकांची कामही झालं पाहीजे. भाषण तर कोणताही पट्टीचा वक्ता करू शकतो. पण भाषणाबरोबर कामही झालं पाहीजे, अशीही टीका अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
हेही वाचा
Ajit Pawar on Supriya Sule। ‘अजित पवार यांना भेटणं टाळलं’ सुप्रिया सुळे म्हणाल्या…