Pankaja Munde | भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 72 उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये बीड मध्ये प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. अशात पंकजा मुंडे विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आज दुपारी ३ च्या सुमारास निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. त्या पूर्वी महाविकास आघाडी कडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीडच्या जागेवर मविआकडून राष्ट्रवादी शरद पवार गट दावा करत असल्याचीही माहीत समोर येत आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडेंविरोधात जास्त मत मिळणार उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीने योजना आखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बीडचा उमेदवार ठरविण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. शरद पवार गटाकडून डॉ. नरेंद्र काळे, प्रा. ईश्वर मुंडे, सुशीला मोराळे, रविकांत राठोड हे इच्छूक आहेत. तर डॉ. अशोक थोरात, डॉ. ज्योती विनायकराव मेटे, बजरंग सोनवणे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.
हे वाचला का ? नेमकं कारण काय ? नवनीत राणा आपल्याच पक्षाचा राजीनामा देणार?