Ajit Pawar on Supriya Sule । विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो रोजगार मेळाव्या आज संपन्न झाला . या मेळाव्या गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. यावेळी मंचावर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येताच, सुप्रिया सुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे आल्या होत्या.
सुप्रिया सुळे यांनी हाथ जोडत एकनाथ शिंदे यांचे हात जोडून स्वागत केले होते. मात्र याच वेळी शिंदे यांच्या मागे असलेले अजित पवार यांनी जनतेकडे हाथ दाखवत अभिवादन केले, आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरसावल्या. सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांचे हाथ जोडत स्वागत केले. याही वेळेस अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांशी नजरा-नजर करणे टाळले.
यावेळी त्यांच्याशेजारीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होत्या. मात्र दोघींनीही मंचावर एकमेकांशी बोलणे टाळले. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा तिथून निघून गेले असं म्हणत त्यांनी माध्यमांशी बोलतांना एका वाक्यात उत्तर दिले.
दरम्यान सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या व्हिडिओवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पवार बहीण-भावातल्या ‘त्या’ क्षणाची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.
हेही वाचा
का रे दुरावा? एकाच मंचावर पण… पवार बहीण-भावातल्या ‘त्या’ क्षणाची चर्चा…